साक्री प्रतिनिधी- अकिल शहा
साक्री : साक्री तालुक्यातील वसमार येथे आमदार गावित यांच्या उपस्थितीत भगवान वीर एकलव्य मूर्तीचा जीर्णोद्धार व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न.
एकलव्य आदिवासी भील संघटना, अखिल महाराष्ट्र विद्यार्थी व एकलव्य कमांडो युवा शक्ति यांच्या वतीने साक्री तालुक्यातील वसमार येथे दि.३० सप्टेंबर शुक्रवारी रोजी भगवान विर एकलव्य मूर्ति जीर्णोद्धार व समाज प्रबोधन सोहळा आयोजित करण्यात आला होता, साक्री च्या आमदार श्रीमती मंजुळाताई गावित यांच्या हस्ते भगवान विर एकलव्य मूर्ति जीर्णोद्धार करुण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री धर्मेंद्र बोरसे यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी गावात डीजे च्या तालावर नाचत गाजत रैली काढण्यात आली या वेळी जि.प. माजी सदस्य डॉ. तुळसीराम गावित,संघटनेचे उपाध्यक्ष मच्छिद्र गायकवाड़,प.स. सदस्या श्रीमती.अर्चनाताई देसले, वसमार गावाच्या सरपंच श्रीमती संगीता नेरे, माजी प.स. सदस्य राजधर देसले, संघटनेचे तालुकाध्यक्ष नानाभाऊ बोरसे, चंदू माळचे व तसेच संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.