नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गांजाची शेती करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : एकुण, 7 लाख 86 हजार रुपये किमंतीचा 112 किलो गांजा जप्त..



प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -: गांजाची शेती करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : एकुण, 7 लाख 86 हजार रुपये किमंतीचा 112 किलो गांजा जप्त..
या बाबत अधिक माहिती अशी कि, नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रसार होवू नये म्हणून पो. अधीक्षक हे खुप संवेदनशील असून गांजा , अफु इत्यादी प्रकारचे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक , लागवड करणाऱ्याची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते .
त्यामुळे जिल्ह्याचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा हे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक व लागवड यांचे वर कारवाई करणे साठी त्या बाबत ची माहिती घेत होते . दि. 2 ऑक्टोंबर रोजी नंदुरबार पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत शहादा तालुका हद्दीतील सटीपाणी गावात एका इसमाने त्याच्या कपाशी पिकाचा शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्री शिर बातमी सांगितली .
पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले .
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व त्यांचे अमंलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमीच्या ठिकाणी सटीपाणी गावाचे शिवारात कापसाचे पीक असलेल्या शेतांकडे पायी गेले असता सदर बातमी मधील संशयीत एका कापसाचे पिकाचे शेतात हालचाली करत असल्याचे दिसून आले .
पोलीसांचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथून पळ काढला . स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदारांनी त्याचा पाठलाग केला असता तो शेजारी असलेल्या नाल्यातून जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला . पोलीसांनी कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिक ठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले , म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण शेती पिंजून काढली असता तेथे 112 किलो 33 ग्रॅम वजनाचे 7 लाख 86 हजार 331 रुपये किंमतीची एकुण 150 गांजाची झाडे मिळुन आल्याने गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतला . तसेच आरोपी गणेश लकड्या भोसले ( पावरा ) रा . सटीपाणी ता . शहादा जि . नंदुरबार याचे विरुध्द् शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 617/2022 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 ( क ) . 20 ( ब ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
सदर ची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर , पोलीस उप निरीक्षक छगन चव्हाण , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे , राकेश वसावे , पोलीस नाईक अविनाश चव्हाण , रमेश साळुंके , पोलीस अमंलदार विजय ढिवरे , राजेंद्र काटके , अभिमन्यु गावीत , चेतन चौधरी , शहादा पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस उप निरीक्षक काळूराम चौरे , पोलीस हवालदार अमृत पाटील , रतन पावरा , दिनकर चव्हाण यांचे पथकाने केली असुन,पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे .

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की , तंबाखूजन्य व अमली पदार्थाचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात . तसेच अंमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक , सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो . तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसना पासून लांब राहावे असे आवाहन केले.

पी . आर . पाटील,भा.प.से.
पोलीस अधीक्षक ,
नंदुरबार.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:07 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!