प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: येथील खोडाई माता यात्रौत्सवात चोरी करणाऱ्या २ संशयीत महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात घेतले असुन १३ सोन्याचे लॉकेट हस्तगत करण्यात आले आहे .
या बाबात अधिक माहिती अशी कि , १ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वा . सुमारास विकास निंबा धनगर रा . नितीन साहित्य नगर , नंदुरबार हे त्यांच्या पत्नी , मुलगी सह नंदुरबार शहरातील खोडाई माता यात्रौत्सव पाहण्यासाठी गेले असता त्यांची ३ वर्ष वयाची मुलगी हिच्या गळ्यातील ४ हजार ७०० रु.कि. चे अंदाजे १ ग्रॅम वजनाचे काळ्या दोऱ्यातील सोन्याचे ओम पान चोरी झाल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे जावून तक्रार दिल्याने भा.द.वि. कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदर चा गुन्हा दाखल झाल्या नंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदीर परिसरातील खदान भिलाटीत दोन पुरुष व दोन महिला हे संशयास्पदरित्या फिरत आहे .
पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदर बातमीची खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत त्यांनी आदेश दिले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदीर परिसरातील खदान भिलाटीत मिळालेल्या बातमी मधील दोन पुरुष व दोन महिलांचा शोध घेतला असता दोन पुरुष व दोन महिला हे खदान भिलाटी परिसरात संशयीतरीत्या फिरतांना दिसून आले . सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला असता पुरुषांना त्याबाबत संशय आला व ते पळून जाण्यात यशस्वी झाले . त्यातील दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस अमलदारांनी ताब्यात घेतले .
ताब्यात घेतलेल्या दोन्ही महिलांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्या उडवा उडवीची उत्तरे देवू लागले , म्हणून त्यांना महिला पोलीस अमलदारांनी स्थानिक गुन्हे शाखेत आणून विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी त्यांची खरे नावे सांगून त्या अकोला जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले . ताब्यातघेतलेल्या दोन्ही महिलांना सखोल विचारपूस केली असता त्या त्यांच्या नातेवाईकांसह मागील ३ ते ४दिवसापासून नंदुरबार येथे आल्या असून शहरातील खोडाई माता यात्रेतून रात्रीच्या वेळेसे गर्दीचा फायदा घेवून लहान मुले , मुलींच्या गळ्यातील सोन्याचे वस्तूंची चोरी करीत असल्याचे सांगितले . सदर महिलांच्या ताब्यात असलेल्या पिशव्यांची पाहणी केली असता त्यात ५४ हजार ६३२ रुपये किमतीचे १३ सोन्याचे लॉकेट व २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकुण ७४ हजार ६३२ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला . सदरच्या सोन्याच्या वस्तु व मोबाईल त्यांनी खोडाई माता परिसरातून चोरी केल्याचे सांगितले . सदरचा मुद्देमाल हा कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतला आहे . ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही महिला व मुद्देमाल गुन्ह्याचा तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे .
सदर ची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , महिला विजया बोराडे , प्रमिला वळवी , प्रिती गावीत , अरुणा मावची , राकेश मोरे , मोहन ढमढेरे , रमेश साळुंखे , अभय राजपुत , आनंदा मराठे यांचे पथकाने केली आहे .
ज्या भाविकांचे मुले , मुलींच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खोडाई माता यात्रौत्सावातून चोरी झालेले असतील त्यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा . तसेच यावर्षी नंदुरबार शहरातील खोडाई माता यात्रौत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सर्व भाविकांनी आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या व चोरांपासून सावध राहा .
असे आवाहन पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे .