प्रतिनिधी – प्रवीण चव्हाण
नंदुरबार – नवापूर येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाशी वाद घालून कॉलर पकडून शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील कुंभारवाडा येथील प्रजापती समाज गरबा उत्सव मंडळ येथून जवळ असलेल्या एका मोबाईल रिपेरींग दुकानासमोर तीन लोक आपसात वाद घालत होते. यावेळी त्याठिकाणी गरबा मंडळ येथे पोलीस शिपाई विश्वास वळवी व होमगार्ड शासकीय गणवेशात डयुटी करीत असतांना त्यांना वाद होतांना दिसला यावेळी पोलीस शिपाई विश्वास वळवी हे तेथे जावून वाद करू नका असे सांगितले. याचा राग आल्याने मयुर सावरे हा विश्वास वळवी यांच्या अंगावर धावून येवून तु मध्ये कशाला पडला. तुला मी सोडणार नाही असे सांगत पोलीस शिपाई विश्वास वळवी यांची गणवेशाची कॉलर पकडून आरडाओरड करून शिवीगाळ केली व शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलीस शिपाई विश्वास वळवी यांच्या फिर्यादीवरून मयुर शैलेंद्र सावरे रा.शास्त्रीनगर (नवापूर) याच्या विरूध्द भादंवि कलम 353, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि निलेश वाघ करीत आहेत.