नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

9 ऑक्टोबर रोजी परळीत विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन



*नटराज रंगमंदिर येथे होणार व्याख्यान; डॉ.विजय भटकर, डॅा. सागर देशपांडे, बीड जिल्हाधिकारी यांची असणार उपस्थिती*

परळी (प्रतिनिधी) बाबा शेख


परळी : रविवार, दि.9 ऑक्टोबर रोजी परळीतील नटराज रंगमंदिर येथे विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले असून, अनेक दिग्गज मान्यवरांचे व्याख्यान होणार आहे. स्व.दिनकरराव गित्ते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श शिक्षक, शिक्षणप्रेमी पालक, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून व्याख्यान कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सुपर कॉमप्युटरचे जनक पद्मभूषण डॉ.विजय भटकर, त्रिपुरा राज्याचे बांधकाम आणि नगरविकास सचिव किरणकुमार गित्ते, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते, साप्ताहिक जडण – घडणचे संपादक डॉ.सागर देशपांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. श्री किरण गित्ते यांचे वडील स्व दिनकररावजी गित्ते यांच्या १६ व्या पुणयतिथी निमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे रविवार, दि.9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.

मागच्या काही वर्षात परळीतील शैक्षणिक वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यात शैक्षणिक संस्था, पालक आणि शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. या वातावरणात चढावा रहावा असा आपला प्रयत्न आहे. या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेले शिक्षक आहेत. त्यांचा गौरव केला जाणार आहे. सर्व दक्ष आणि कर्तबगार शिक्षकांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणे शक्य नाही. त्यांचे कार्य दुर्लक्षित राहू नये. त्यामुळे तालूका पातळींवर हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

आपण पाहतो की गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होतो. परंतु शैक्षणिक गुणवत्ता व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयात प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी आणि त्यांचा गौरव होणे आवश्यक आहे. पाल्यांना घडवणारे पालक यांची भुमिका अत्यंत मोलाची असते. ते नेहमी पडद्याच्या पाठीमागे राहतात म्हणून त्यांचाही गौरव केला जाणे आवश्यक आहे.

शासनाने नवीन शैक्षणिक धोरण २०२० साली स्वीकारले आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरीनंदन यांच्या मार्गदर्शनात हे धोरण आणले गेले. आगामी काळातील नागरिक त्या वातावरणाशी सुसंगत असावेत यासाठी याचा अभ्यास केला गेला. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून इतरांच्या तुलनेत नेहमी दहा वर्षे पुढे आहेत. महाराष्ट्रात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वात समिती स्थापन झाली आहे. या समीतीचे सदस्य डॅा. सागर देशपांडे आपल्याला नविन शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

नवीन शैक्षणिक धोरण कसे असेल? त्याचे स्वरूप कसे असेल? याविषयी ते सखोल मार्गदर्शन करणार आहेत. जुन्या शिक्षण पद्धतीशी जुळवून घ्यायला किंवा ती कळायला आपल्याला इतकी वर्ष लागली. नवे शैक्षणिक धोरण आपल्याला नेमके कळावे यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याचा फायदा येथील जागरूक पालकांना आणि विद्यार्थ्यांना होणार आहे.

त्याचबरोबर महासंगणक निर्माते डॉ.विजय भटकर हेसुद्धा या कार्यक्रमात असणार आहेत. नालंदा विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ.भटकर हे पुढच्या भविष्याचा वेध घेणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या वैज्ञानिक संकल्पना ऐकण्याची पर्वणी आपल्याला या कार्यक्रमात मिळणार आहे.

शैक्षणिक क्षेत्राची आवड असलेले जागरूक पालक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा उषा किरण गित्ते यांनी केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:21 am, January 13, 2025
temperature icon 18°C
साफ आकाश
Humidity 57 %
Wind 5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!