प्रतिनिधी बीड : घरात झापलेली असताना साप चावल्याने ऊसतोड कामगाराच्या १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीडच्या केज तालुक्यातील सातेफळ गावात घडली आहे. पायल रामेश्वर साळुंके असं सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ती कळंब येथील महाविद्यालयात १२ वीच्या वर्गात शिकत होती.
पायल काल दुपारी आपल्या घरी झोपलेली असताना सायंकाळी ४ च्या दरम्यान घरात शिरलेल्या विषारी सापाने तिच्या डाव्या पायाच्या बोटाला आणि टाचेच्या शिराजवळ चावा घेतला. सापाने चावा घेतल्यानंतर पायलला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र, पायलचा आज दुपारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला या घटनेने सातेफळ गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.