प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री: संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद सण शहरासह परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.भारतातील सर्व मुस्लिम बांधव हा सण मोठ्या उत्साहात आज ९ ऑक्टोम्बर रविवारी रोजी साजरा करीत आहे, या सणाला ईद-ए-मिलाद किंव्हा बारवफत असेही म्हणतात,१२ रबी-उल-अव्वल तारखेला हा सण साजरा केला जात आहे, हा सण मुस्लिम समाजासाठी खुप महत्वाचा असतो. ईद-ए-मिलाद म्हणजेच ईद मिलाद उन नबी हा प्रेषित मुहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस पूर्णपणे पैगंबर मुहम्मद आणि शिकवणीना समर्पित आहे.
साक्री शहरात ईद ए मिलाद निमित्त शहरातील मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करीत शहरातील प्रमुख भागात शांततेत जुलूस काढण्यात आला, या द्वारे शांतीचा संदेश देण्यात आला, विविध पक्ष,संघटनातर्फे मिरवणूकीचे स्वागत करण्यात आले,कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने शहरात कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता,पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवीत उत्सव शांततेत पार पड़ण्यासाठी मेहनत घेतली,कुठेही अनुचित प्रकार न घडल्याने पोलीश यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला .
पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक अजयकुमार चव्हाण,पीएसआय रोशन निकम,पीएसआय भानुदास न-हे , हे.काँ.संजय शिरसाठ, हे.काँ.बी.एम.रायते दादा, पोलिस नाईक कलीम पटेल,पोलीस नाईक शांतिलाल पाटील,निखिल काकड़े,इरफान शेख,सुनिल अहिरे,होमगार्ड्स आदि यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवून मेहनत घेतली.