प्रतिनिधी : महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा : शिंदखेडा मतदार संघाचे पाणीदार आमदार व माजी मंत्री मा.जयकुमार भाऊ रावल यांच्यासह नऊ जनावर रावण दहन प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल आहे.
तो मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपचे गटनेते व परिसरातील कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांना निवेदन देण्यात आले.
राजकीय भांडवल करुण आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या सह नऊ जनावर गुन्हा दाखल झाला आहे, हा प्रकार जातीय सलोखा बिघडविण्याचा आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध केला असुन गुन्हा माघे घ्यावा अशी मागणी निवेदना्वारे करण्यात आली.
या वेळी भाजपचे गटनेते अनिल वानखेडे, शहराध्यक्ष प्रविण माळी, सुभाष माळी, उमेश गिरासे युवराज माळी, प्रकाश देसले, उल्हास देशमुख,चेतन परमार, किसन सकट, बाळासाहेब गिरासे. दादा मराठे आदि उपस्थित होते. या वेळी अधिकारी वर्गाशी चर्चा करण्यात आली.