प्रतिनिधी – महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा : तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्या निमित्ताने शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावांचे ग्राम रोजगार सेवक हे प्रशिक्षणासाठी उपस्थित होते त्या प्रशिक्षणासाठी पंचायत समिती विस्तार अधिकारी , व माननीय श्री. देविदास देवरे गट विकास अधिकारी शिंदखेडा यांची उपस्थिती. लाभली.
एक दिवसीय प्रशिक्षणा कार्यक्रमात सर्व ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले व त्यानंतर त्यांना अलाणे ग्रामपंचायत तर्फे भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.सिंदखेडा तालुक्यातील पंचायत समिती गटविकास अधिकारी माननीय देवरे साहेबांनी अलाणे गावाची विकास कामासंदर्भात पाहणी केली व त्यांचा छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यांचा सत्कार अलाणे गावाच्या प्रथम नागरिक सौ. अरुणाबाई कोमलसिंग गिरासे यांनी केला या कार्यक्रमाला गावातील तरुण वर्ग व ज्येष्ठ लोकांचे सहकार्य लाभले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.