प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:शहरातील बसस्थानकात व शहादा बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या दोघा महिलांच्या पर्सची चैन उघडून दोघा महिलांच्या पर्समधून सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने व रोकड चोरुन नेल्याची घटना घडली .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा येथील नुतन दिनकर मिस्तरी या नंदुरबार बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना अज्ञातांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून त्यातील ४० हजार रुपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र पोत व अडीच हजार रुपयांची रोकड असा सुमारे ४२ हजार रुपये ५०० रुपये किंमतीचे ऐवज लंपास केला .
याबाबत नुतन मिस्तरी यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील पोना . श्रीकांत माळी करीत आहेत .
तसेच शहादा तालुक्यातील मंदाणा येथील संदिप दगडू साळुंखे यांची पत्नी हर्षदा या अमळनेर येथे जाण्यासाठी शहादा बसस्थानक येथून शहादा – जळगाव बस मध्ये चढत असतांना अज्ञाताने त्यांच्या पर्सची चैन उघडून त्यात असलेला सोन्याचे दागिने असलेला बॉक्स चोरुन नेला . सदर बॉक्स मध्ये ८४ हजार रुपये किंमतीचे २८ ग्रॅम वजनाची एक सोन्याची मंगलपोत , ४८ हजार रुपये किंमतीचे १६ ग्रॅम वजनाची एक मंगलपोत व २८ हजार ५०० रुपये किंमतीचे ५ ग्रॅम ३ ग्रॅम वजनाचे कानातले टोंगलची जोडी व दीड ग्रॅम वजनाची किल्लूची जोडी असे एकूण १ लाख ६० हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने होते .
याबाबत संदिप साळुंखे यांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .