प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:धडगाव तालुक्यातील अस्तंभा येथे मुलाला मारहाण करणाऱ्या पतीला मज्जाव केल्याने याचा राग आल्याने पतीने बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान २३ वर्षीय पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली . याप्रकरणी धडगांव पोलीसात पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , धडगाव तालुक्यातील अस्तंभा येथील रुपसिंग पारशी वळवी हा १७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्याच्या तीन वर्षीय मुलगा आयुश याला मारहाण करीत होता .
यावेळी रुपसिंग वळवी यांची पत्नी सुमित्रा रुपसिंग वळवी ( वय २३ ) यांनी पतीला मारहाण करु नका असे सांगत मुलाला सोडविण्यासाठी गेली . याचा राग आल्याने रुपसिंग वळवी याने पत्नी सुमित्रा यांना हाताबुक्यांनी मानेवर , हातावर , छातीवर व पोटावर बेदम मारहाण करुन गंभीर दुखापत केले .
सुमित्रा रुपसिंग वळवी यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरु असतांनाच सुमित्रा वळवी यांचा मृत्यू झाला .
याबाबत जलसिंग हिरालाल पाडवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात रुपसिंग वळवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण महाले करीत आहेत .