आंतरराष्ट्रीय किर्तीचे सुप्रसिध्द मैजिशियन जादूगार शहेनशाह यांचे साक्री शहरात
३० ऑक्टोंबर पासून आकर्षक जादूचे प्रयोग
प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री :- आंतरराष्ट्रीय किर्तीचे सुप्रसिद्ध मॅजिशियन ‘जादूगर शहेनशाह यांचे साक्री शहरातील राजे लॉन्स येथे दि. ३० ऑक्टो. २०२२ पासून पुढील महिनाभर रोज सांयकाळी ६ वाजता व रोज रात्री ९ वाजता आकर्षक जादुचे प्रयोग सादर होणार आहेत. जादूगार शहेनशाह हे पहिल्यांदाच साक्री शहरात आले असुन योग्य त्या तिकिट दरात ते दर्शकांचे मनोरंजन व प्रबोधन करणार आहेत. तरी साक्री तालुक्यातील आबालवृध्दांनी या मनोरंजन व प्रबोधनपर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जादूगार शहेनशाह व त्यांचे व्यवस्थापक सहकारी मैजिशियन अभयकुमार, मैजिशियन रेम्बो व त्यांच्या समुहातील कलावंतानी केले आहे.
जादूगार शहेनशाह गेल्या ४० वर्षापासुन या क्षेत्रात सक्रिय असून आजपर्यंत देशभरात तसेच दुबई, श्रीलंका, शारजाह, बहारिन, फिजी आयलॅण्ड आदि देशात सुमारे ११ हजारांपेक्षा अधिक मॅजिक शो केले आहेत. या क्षेत्रातील ही त्यांची सातवी पिढी असून त्यांचे पूर्वज महमद छेल हे पुर्वी विविध राजदरबारांमध्ये जादुचे प्रयोग सादर करीत असतं. जादूगार शहेनशाह यांचे कोविडकाळ वगळता गेली ४० वर्षे देशात परदेशात सातत्याने प्रयोग सुरु असतात,
जादूगार शहेनशाह यांची ४५ कलावंतांची टीम असुन आकर्षक संगीत, नृत्य व प्रकाशयोजनेसह हवेत मुलीला अधांतरी उडविणे, तरुणीचे गोरिलात रुपांतर करणे, एका व्यक्तीच्या शरिराचे दोन तुकडे करणे व ते पुन्हा जोडणे, खाली हाथोसे रुपयोंकी बारिश आदि प्रकारचे विविध आकर्षक जादुचे प्रयोग ते सादर करणार आहेत. सुमारे अडीच तासांच्या या मॅजिक शो मधुन मनोरंजनासोबतच राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, पर्यावरण रक्षण, जलजीवन अभियान, राष्ट्रीय साक्षरता आदि राष्ट्रहितपर संदेशही दिला जाणार आहे.
जादूगार शहेनशाह यांना श्रीलंका सरकारचा नॅशनल मॅजिक अवार्डसह विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचेसह त्यांच्या टीममधील सर्व सदस्य राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त नॅशनल मॅजिक अॅकॅडमीचे सदस्य आहेत. तरी या मनोरंजनपर्वाचा साक्री तालुक्यातील सर्व आबालवृध्दांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जादूगार शहेनशाह व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केले आहे.