DPT NEWS Network प्रतिनीधी – अकिल शहा
साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील १७ नवनिर्मित ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाच्या महिला आरक्षणाची सोडत सभा तहसील कार्यालय,साक्री येथे ७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहे.
ही आरक्षण सोडत घेण्यासाठी तहसीलदार साक्री यांना प्राधिकृत करण्यात आले असून तहसीलदार साक्री यांनी अनुसूचित क्षेत्रातील १७ नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या महिला आरक्षण सोडत (ड्रा-लॉटस) पद्धतीने निश्चित करून उर्वरित ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यासाठी सभेचे आयोजन करण्याबाबत ही आदेशात सूचित केले आहे या सभेस तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नागरिक सदस्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाच्या ग्रामपंचायत मध्ये जयरामनगर, कैलास नगर,पुनाजीनगर,कुत्तरखांब, शिवाजीनगर,बागुलनगर, हनुमंतनगर,राईनपाडा, मल्ल्याचापाडा,गव्हाणी पाडा,माळपाडा,बोढरीपाडा, चिंचपाडा,महुबंद,पोखारे,ओझरदे,होळयाचापाडा,म्हाळयाचापाड़ा, हारपाडा, सांडेर,खट्याळ,वर्दळी,चावड़ीपाडा, पिंजारझाडी,साबर सोंडा, यांचा समावेश आहे.