—————————————-
औरंगाबाद – प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य साईबाबा यांचे जन्मगाव पाथरी जिल्हा परभणी येथून साईबाबा यांच्या दिव्य चैतन्य पादुका आपल्या औरंगाबाद शहरात दर्शनासाठी आलेल्या आहेत,चार नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर पर्यंत हा चैतन्य तालुका दर्शन सोहळा भक्तांसाठी शहरात आयोजित केला आहे, आज शहरात या चैतन्य पादुका पालखी चे आगमन अथर्व बिल्डरचे चे संचालक ,सामाजिक कार्यकर्ते साई भक्त मनोज जैन यांच्या फोर्टी ग्रीन निवासस्थानी झाले, यावेळी चैतन्य पादुका अभिषेक आणि दर्शन सोहळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला,
यावेळी चैतन्य तालुका पालखी दर्शन सोहळ्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती, दर्शन सोहळा कार्यक्रमानंतर जैन परिवारातर्फे भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले, यावेळी शहराचे महापौर श्री नंदकुमार घोडेले यांच्यासह मनोज जैन ,सपना जैन, विमला जैन, रवींद्र जैन,मानसी जैन, प्रवीण पटेल, रिटा पटेल, पुष्पा राणा, बंटी जैस्वाल, सुनील मोरे, सुधीर जोशी, अनिल राठोड, विकास वाघमारे, संजय भुसारी, दिलीप भंगाळे, जयश्री भंगाळे, पत्रकार रतन राऊत, मंगल राऊत, साक्षी राऊत, नितीन दामले, अनिल रोटे, अशोक कवडे, सह शहरातील असंख्य साईभक्त आणि फोर्टी ग्रीन सोसायटीतील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.