माणगांव – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, माणगांव तालुका पत्रकार संघाच्या वतीने माणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रवीण सुरेश पाटील हे सेवानिवृत्त झाल्याबद्द्ल त्यांचा माणगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कर्तव्यदक्ष श्री प्रवीण पाटील हे उपअधिक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गेली दोन वर्षे निष्ठेने माणगांव करांची सेवा केली. त्यांची ज्या ठिकाणी बदली झाली तेथे निष्ठने सेवा केली. पाटील साहेबाचा जन्म पालघर येथे झालं. 35 वर्ष पोलीस खात्यात सेवा करीत आज रोजी त्यांची माणगांव येथे सेवानिवृत्त मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रायगड जिल्ह्यातील पोलीस खात्यातील कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे माणगांव तालुक्यातील सर्व पक्षातील कार्यकर्ते यांनी पाटील साहेबाना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या कुटूंबापासून दूर राहुन आपल्याला सुरक्षित जीवनाचा आनंद देणारे महाराष्ट्र पोलीस म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल असे जवळपास साडेतीन दशकाचे झंझावाती आयुष्य पोलीस खात्यात व्यतित करून जनतेची सेवा करून निवृत्त होणारे रुबाबदार डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होता. पोलीस खात्यात अलीकडंच्या काळात केवळ दुर्मिळ असे कर्तव्यदक्ष, कर्तव्यतत्पर सेलिब्रेटीनाही लाजवेल असे चिरतरुण पोलीस अधिकारी आज शासन नियमानुसार वयाची अट म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. ज्यांना पाहताक्षणी पोलीस अधीक्षक पोलीस अधिकारी असावा तर कसा तर पोलीस अधिकारी असावा प्रवीण पाटील सरांसारखा अशी चर्चा सुरु आहे.
१५ जून १९८७ साली एम पी ए एस सी पोलीस खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत झाले. २८ वर्ष मुबंई आर्थिक गुन्हे शाखा, क्राईम ब्रँच, पोलीस स्टेशन, डिटेक्टिव्ह ब्रँच अशा अनेक विविध विभागात कामे केली. यानंतर तीन वर्ष अमरावती विभागाची यशस्वी धुरा सांभाळली. पालघर, भोईसर, खेड येथे आपल्या कामाने लोकांची मने जिंकली. पोलीस उप अधीक्षक उप विभागीय अधिकारी प्रवीण पाटील हे माणगांवमध्ये १६ ऑक्टोबर २०२० रोजी रुजू झाले. त्यांच्यामध्ये एक देखणा नायक कलावंत सुद्धा दंडलेला आहे हे त्यांना पाहिल्यावर लक्षात येते. त्यांनी काही मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयही केले आहेत. अभिनयाचे अंग असलेला हा नायक प्रत्यक्ष जीवनातही खरा हिरो ठरला आहे. सराची ओळख एन्काऊटर स्पेशालिस्ट म्हणूनही आहे. अशी ओळख असलेले प्रवीण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.