प्रतिनिधी भुवनेश दुसाने
पाचोरा ( वार्ताहर) दि, ७
पाचोरा भडगाव मतदार संघात सुमारे ८०० किलोमीटर लांबीच्या शेत रस्त्यांची मागणी असून यातील शंभर किलोमीटर लांबीचे ८१ रस्ते मंजूर झाले आहेत मात्र या रस्ते कामांच्या प्रत्यक्ष कामे सूरु होणाऱ्या विलंबाबद्दल आमदार किशोर अप्पा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजना बद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले असून मंजूर रस्ते कामांना त्वरित सुरवात करण्याचे व ते त्वरित पूर्ण करण्याचे आदेशीत केले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांच्या कार्यालयात सोमवारी दुपारी १२ वाजता शेत पाणंद रस्ते कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल यांची उपस्थिती होती.
राज्य शासनाच्या मातोश्री शेत पाणंद रस्ते योजनेतून पाचोरा भडगाव मतदार संघात शेत रस्ते व्हावे यासाठी आ.किशोर अप्पा पाटील यांनी आधीपासूनच आग्रही भूमिका घेतली असून शासनाकडून पहिल्याच टप्यात पावसाळ्यापूर्वीच १०० किलोमीटर लांबीचे ८१ रस्त्यांना मंजूरी आणली होती.यासाठी शासनाने एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २८ ते ३० लक्ष रुपये निधी याप्रमाणे मंजुरी दिली आहे.तसेच दुसऱ्या टप्यात पुन्हा सुमारे २०० किलोमीटर लांबीच्या शेत रस्त्यांना मंजुरी प्रतीक्षेत आहे.मतदार संघातील अनेक शेतकरी बांधवांना शेत रस्त्यांअभावी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे आगामी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शेत रस्त्यांची कामे मार्गी लागावे यासाठी आमदार किशोर अप्पा पाटील यांचा प्रयत्न असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वा दिरंगाईमुळे शेतकरी बांधवांच्या शेतरस्त्यांच्या विषयाला उशीर होऊ नये असे आपली भूमिका असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगत कालबद्ध पद्धतीने कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बैठकीला तहसीलदार कैलास चावडे, पाचोरा गटविकास अधिकारी अतुल पाटील,भडगाव गटविकास अधिकारी वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते श्री थोरात, श्री वाडीले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी ,बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भडगाव तालुका प्रमुख संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.
——————–
*प्रतिक्रिया:* शेतरस्ता हा शेतकरी बांधवांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून आगामी २०२४ पर्यंत शेतकऱ्यांनी मागणी केलेले पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे आठशे किलोमीटर लांबीचे शेतरस्ते आपण पूर्ण करण्याचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.शेतकरी बांधवानी देखील रस्ते होणे कमी कोणताही अडथळा निर्माण न करता समन्वय व परस्पर सहकार्यातून प्रशासनास सहकार्य करावे जेणेकरून भविष्यात शेतकरी बांधवाला रस्त्याअभावी कोणतीही अडचण येणार नाही.
*किशोर अप्पा पाटील*
*आमदार पाचोरा-भडगाव*