DPT NEWS Network
भुवनेश दुसाने .(पाचोरा)
दिनांक~०८/११/२०२२
दिनांक ७ नोव्हेंबर सोमवार रोजी माध्यमांशी बोलतांना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसतर्फे आज ८ नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी १२ वाजता पाचोरा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहिर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, उपाध्यक्षा प्रा. डॉ. सुनिता मांडोळे, सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षा प्रा. वैशाली बोरकर, युवतींच्या जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे, तालुका उपाध्यक्षा नम्रता पाटील, अनिता देवरे, जयश्री हिरे, आशा जोगी, तालुका अध्यक्षा रेखा देवरे, तृतीयपंथी तालुका अध्यक्षा सिमा सायराजान, मुनमुन सिमाजान, शांताबाई सिमाजान, रेणुका सिमाजान, गंगोत्री सिमाजान, मा. नगरसेवक भुषण वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील, शहर अध्यक्ष अजहर खान, नितीन तावडे, कार्याध्यक्ष विलास पाटील, वासुदेव महाजन, युवक तालुका अध्यक्ष अभिजित पवार, सागर हिरे, हरिष पाटील, पिंटु भामरे, उत्तम पाटील, अशोक सोन्नी, जय सुतार, ए. बी. अहिरे, ए. जे. महाजन, भगवान मिस्तरी, गौरव वाघ, हमिद शहा, सत्तार पिंजारी, सुदर्शन सोनवणे, निलेश पाटील, प्रदिप वाघ, विनोद पाटील, तेजस पाटील, उत्तम समारे, सलमान सैय्यद, जगदिश पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सौ. वंदनाताई चौधरी व कार्यकर्ते.
तालुकाध्यक्ष मा. श्री. विकास पाटील सर.
शहराध्यक्ष मा. अझहर भाई.
प्रा. सौ. सुनिता ताई मांडोळे.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ शहरातील गुलाब डेअरी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालया पासुन भव्य स्वरूपात मोर्चा काढण्यात आला. सदरचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येवुन याठिकाणी उपस्थितांनी गोल रिंगण करुन “पन्नास खोके एकदम ओके”, “अब्दुल सत्तार हाय हाय”, “सुप्रियाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहर अध्यक्ष अजहर खान यांनी एकमुखाने अब्दुल सत्तार यांचा निषेध नोंदवत अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. राजीनामा न दिल्यास राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारून त्यांना आपल्या मंत्रीमंडळातुन बडतर्फ करावे. असे न झाल्यास याहुनही अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी उपस्थितांनी दिला.