प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : साक्री शहरातील पेरेजपूर रोडवरील श्रीरंग कॉलनीत राहणारे बाळू रामा बागुल (वय५०) हे दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास साक्री शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेत भरणा करण्यासाठी गेले होते, यावेळी दोन अज्ञात महिला चोरांनी त्यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या हातातील कॅरीबॅगमध्ये असलेले दीड लाखांची रोकड होती ती लांबवून पसार झाले. बागुल यांच्या लक्षात ही घटना आली असता त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून साक्री शहरात सर्वत्र तपास केला परंतु त्या अज्ञात दोन महिला चोर पसार होण्यात यशस्वी झाल्या, साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास एएसआय भिंगारे करीत आहे.