नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गुजरात राज्यात काळ्या बाजारात जाणाऱ्या तांदुळाच्या ट्रकवर, सहाय्यक पोलीस अधीक्षक रेड्डी यांची दमदार कारवाई.

DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी – युवराज पाटील
धुळे : आज दि.08.11.2022 रोजी देखील एस. ऋषिकेश रेड्डी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाल्यानंतर काळा बाजारात विक्रीला जाणाऱ्या तांदुळाचा ट्रक पकडला. आज रोजी धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एस. ऋषिकेश रेड्डी यांनी गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आपल्या पथकासह सुरत बायपास रोडवर चक्कर बर्डी उचाळे वस्तीजवळ सापळा रचून वाहन चेक करीत असताना उदगीर जिल्हा लातूरहून गुजरात राज्यात काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असलेला तांदुळाचा ट्रक क्रमांक MH.03..9786 आढळून आला. सापळ्यात तो ट्रक थांबवून चेक करीत असताना चालकास विचारपूस केली असता ट्रक ड्रायव्हरने व क्लीनर याने उडवा उडविचे उत्तर दिले त्याच वेळेस ट्रकच्या मागील भाग उघडून चेक केले असता त्यात रेशनिंगचा तांदूळ आढळून आला. ट्रक ड्रायव्हर व क्लिनर यास ताब्यात घेऊन पथकाने शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले असून पुरवठा निरीक्षक यांना कळविण्यात आले आहे . पुरवठा निरीक्षक यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाईत 15 लाख रुपये किमतीचा ट्रक व 6 लाख 5 हजार 880 रुपये किमतीचा रेशनिंगचा तांदूळ असा 21 लाख 50880 रुपयांचा मुद्देमाल सदर पथकाने जप्त करून धुळे शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेला आहे. सदर कारवाई श्री. एस. ऋषिकेश रेड्डी सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे विभाग धुळे यांच्यासह पथकातील सपोनि. संगीता राऊत, पोहेकॉ. आरिफ शेख , पोहेकॉ. जितेंद्र आखाडे, पोहेकॉ.भागवत पाटील, चालक देवेंद्र काकडे सर्व नेमणूक शहर वाहतूक शाखा धुळे तसेच उपविभागीय कार्यालयातील पोहेकॉ. कबीर शेख , पोहेकॉ. सुनील शेंडे यांनी ही कारवाई पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:54 pm, January 14, 2025
temperature icon 30°C
साफ आकाश
Humidity 31 %
Wind 12 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!