नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वेल्हाणे येथे पोलीस पाटील यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार संपन्न….

DPT NEWS प्रतिनिधी- मनोहर पाटील

धुळे : lतालुक्यातील वेल्हाणे येथे पोलीस पाटील पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल अण्णासाहेब श्री इंद्रसिंग नारायणसिंग पवार यांचा स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेकडून स्वामी विवेकानंदांचा फोटो भेट देत सत्कार करण्यात आला. व सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस पाटील म्हणून इंद्रसिंग अण्णा यांची कारकीर्द खूप चांगली पार पडली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अति संवेदनशील अनेक गोष्टी अत्यंत संयमी पणे आणि चांगल्या पद्धतीने हाताळल्या आणि एक कर्तव्यदक्ष कार्यक्षम पोलीस पाटील कसा असावा याचं एक उदाहरण गावाला घालून दिलं. गावात अति संवेदनशील परिस्थिती असतांना देखील निपक्षपाती धोरण बाळगत गरिबातील गरीब व शेवटच्या घटकाला न्याय कसा मिळवून देता येईल त्यासाठी त्यांनी न्यायाची भूमिका घेतली आणि आपली जबाबदारी पार पाडली. कोरोना सारख्या महाभयानक परिस्थितीमध्ये गावातील सर्व स्थिती अत्यंत उत्कृष्टरित्या हाताळली. गावात येणाऱ्या नवीन नागरिकांची नोंदणी असो,गावातील तरुणांना एकत्र करत गावामध्ये फवारणी असो, जनजागृतीसाठी गावातून स्पीकर ने नागरिकांना माहिती देणं असो, गावात पाळलेलं कडक लॉकडाऊन असो, क्वारंटाईन लोकांसाठी मदतीचा पुढे केलेला हात असो. सुखदुःखाचे कार्य समारंभ त्या काळातही गावात अत्यंत नियमाप्रमाणे शिस्तबद्ध रीतीने पार पाडून घेतले. वेल्हाणे गाव अति संवेदनशील म्हणून जिल्हाभरात गाजलं होतं. त्यामुळे मतदानाच्या काळात सुद्धा गावामध्ये मोठा फौज फाटा तैनात करावा लागत होता पण हे अति संवेदनशील क्षेत्रातून गावाला काढून अत्यंत शांत आणि तंटामुक्त असं गाव आण्णांनी आपल्या पोलीस पाटील कार्य काळात निर्माण केलं. आणि आज निवडणुकांमध्ये दोन होमगार्ड वर सुद्धा निवडणुका गावात शांततेत घडवून आणल्या. त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात ही मुळातच समाजकार्यापासून झालेली नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून असो, स्वाध्याय परिवार असो किंवा हरिभक्त पारायण अशा सर्वच स्तरातील अनुभवामुळे गावावरची त्यांची पकड मजबूत होती.गावातला माणूस आणि माणूस ते ओळखत होते म्हणून गाव हाताळताना त्यांना खूप सोपं गेलं आणि गावात त्यांच्या नावाची एक आदरयुक्त भिती असल्यामुळे त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यांनी टाकलेला शब्द लोक फिरवत नव्हते आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या कार्यकाळात एक चांगला आदर्श निर्माण करून दिला. त्यांचा कार्यकाळ गावाला अजून जास्त काळ लाभायला हवा होता पण शासनाच्या मर्यादेनुसार सेवानिवृत्ती घ्यावी लागते म्हणून ते सेवानिवृत्त झाले.म्हणून स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेकडून गावातील चांगल कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आणि सत्कार नेहमीच होत असतो या उद्देशाने अण्णासाहेब श्री इंद्रसिंग नारायणसिंग पवार यांचा सत्कार त्यांच्या राहत्या घरी जाऊन करण्यात आला. त्यावेळी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आनंदा मराठे, हिम्मत मराठे, प्रवीण बोरसे,जयदीप पवार,अविनाश वाघ, स्वप्निल पवार, संदीप मोरकर, निलेश पवार, आनंद पवार,अक्षय बोरसे, गोविंदा पवार व छत्रपती युवक बचत गट व विवेकानंद युवक बचत गटाचे सभासद आदी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:10 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!