DPT NEWS NETWORK
प्रतिनीधी – उमेश महाजन
एरंडोल: येथे सन 1998 99 दहावीची बॅच चे विद्यार्थी 22 वर्षांनी येथे महात्मा फुले हायस्कूलमध्ये स्नेह मेळाव्यानिमित्त प्रथमच एकत्र आले ही भरलेली शाळा नव्हे तर मायेचा जिव्हाळा दिसून आला यावेळी माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन अरुण देवराम माळी हे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक बी. एस. चौधरी, डी. एस. पाटील, संभाजी इंगळे, सतीश महाजन, शांतीलाल अहिरे, बी. एम. चौधरी शोभा पाटील, शालिनी महाजन, दिलीप महाजन, आर. बी. महाजन आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक दीपक पवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश महाजन व भगवान महाजन यांनी केले आभार प्रदर्शन श्रीकांत देवरे यांनी केले यावेळी माजी विद्यार्थी किरण महाजन (मुंबई), किशोर भोई सविता बाविस्कर (नागपूर), माया महाजन (शिरपूर), शोभा महाजन, भोलानाथ महाले, मीनल चौधरी, कमलेश चौधरी, किशोर भोई यांचे समायोजित भाषणे झाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक पवार, श्रीकांत देवरे (पनवेल) किशोर भोई, समाधान पाटील, मीनल चौधरी, ज्योति महाजन, सविता बाविस्कर, वर्षा महाजन (नाशिक) यांनी परिश्रम घेतले.