DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका असून तालुक्यातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. काबाळ कष्ट करून येथील शेतकरी शेतीपिक घेतात पेरणी पासून तर पीक मोठी होईपर्यंत आपल्या पोटच्या मुलासारखे त्याला जपतात, त्याची निगा राखतात. महागडे खत व औषधे देऊन त्याला जोमाने वाढवतात तसेच पीक काढणीवर आल्यानंतर पिकाच्या काढण्यासाठी मजुरीचा मोठा खर्चही करतात. बाजारभाव योग्य भाव नसल्याने शेतकरी आपली पीक सांभाळून ठेवतात. शेती पिके कांद्याच्या चाळीत शेतातील घरात, वाड्यात आदी ठिकाणी ठेवलेले असते. परंतु या शेती पिकाला आता चोरट्यांनी लक्ष केले आहे लाख मोलाचे शेती पीक चोरटा एका रात्रीत चोरून नेत आहे. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकं चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे यासाठी तक्रारही दाखल केल्यात तसेच चोरट्यांना पकडून शेतीमाल परत मिळवून द्यावा अनेक वेळा पोलीस प्रशासनाला विनवण्या करून देखील कुठल्याही शेतकऱ्याचे शेती पिक हे त्याला पुरून मिळून देता आले नाही. याचबरोबर पोलिसांना चोरट्यांचा बंदोबस्त करणे शक्य तर झालेच नाही, परंतु चोऱ्या मात्र होतच आहेत. त्यामुळे आपल्या स्तरावर तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा ओळखून त्यांना न्याय देण्यात यावा. तालुक्यात सक्षम अधिकाऱ्याचे नेमणूक करून शेतकऱ्यांच्या या हंगामात झालेल्या सर्व चोऱ्यांचा कसून तपास करण्यात यावा व चोरट्यांना जर बंद करण्यात यावे. असे झाल्यास शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल याचबरोबर ते निसंकोच होणे आपल्या शेती व्यवसाय करतील. अन्यथा अनेक शेतकरी दस्तावले आहेत मोठ्या खर्चाने शेती पिक उभे जरी केले तरी चोरी होण्याची भीती त्यांना सतावत आहे. यामुळे अनेक शेतकरी शेती करावी की नाही असा विचार करत आहेत. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यावे व तसेच याचबरोबर साक्री येथील पोलीस वसाहतीतील जीर्ण झालेल्या इमारती आहेत. अशाच परिस्थितीत पोलीस कर्मचारी व त्यांच्या परिवाराला राहावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या रहिवासासाठी नवीन सुसज्ज इमारती बांधण्यात याव्यात अशा मागण्या संदर्भात जव्हार जि.पालघर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची धुळे जिल्हा भाजपा सरचिटणीस श्री. शैलेंद्र अजगे, राकेश अहिरराव,सुनील देशमुख यांनी भेट घेवून चर्चा करुण निवेदन दिले.