नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

DPT NEWS NETWORK ✍️📝. प्रतिनिधी – किशोर महाले

धुळे : धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. या मयत पोलीस निरीक्षकाने लिहिलेल्या चिठ्ठीत कुणासही दोषी धरू नये असे लिहिले आहे.

धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 2019 पासून प्रवीण विश्वनाथ कदम हे पोलीस निरीक्षक सेवेत आहेत. आज सायंकाळी उशिरा त्यांच्या निवासस्थानाचा दरवाजा बंद होता. त्यामुळे काही सहकाऱ्यांनी त्यांचा दरवाजा वाजवला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नसल्याने सहकाऱ्यांनी पाहिले असता कदम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली.

त्यामुळे ही माहिती तातडीने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी तातडीने पोहोचले. मयत कदम यांच्या खोलीत आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे आढळून आले असून या चिठ्ठीमध्ये आपल्या मृत्यूस कुणासही कारणीभूत धरू नये असे लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मयत प्रवीण कदम हे पुणे येथून 2019 मध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रात आले होते. त्यांचा परिवार नासिक येथे राहत असल्याची माहिती मिळाली असून परिवाराला या संदर्भात कळवण्यात आले आहे. दरम्यान या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात 21 नोव्हेंबर रोजी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची हजेरी लागणार होती. यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जवानांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षण केंद्रात या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. या तयारीला दुपारी मयत पोलीस निरीक्षक कदम यांनी देखील हजेरी लावली. मात्र हा सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचा अखेरचा कार्यक्रम ठरला. यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आपली जीवनयात्रा संपवली.

पीआय प्रविण कदम हे कलाकार, सर्पमित्र, वृक्षप्रेमी, अतिशय मनमिळावु स्वःभावाचे अधिकारी होते. त्यांना संगीत, गायनाची आवड होती. 21 ऑक्टोबर ला होणार्‍या दीक्षांत समारंभाची संगीत कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आज सकाळी त्यांनी आपल्या सर्व मित्रांना गुड मॉर्निंगचा मेसेज केला.

ते आज दिवसभर कोणासही नजरेस पडले नाही. मात्र सायंकाळच्या वेळेला ओळख परेडसाठीही ते न दिसल्याने त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना फोन केला. मात्र ते फोन उचलत नसल्याने घरी जाऊन पाहणी केली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. या घटनेमुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:50 am, January 15, 2025
temperature icon 22°C
घनघोर बादल
Humidity 50 %
Wind 12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!