DPT NEWS NETWORK. प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री येथे सुरू असलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नुतन माध्यमिक विद्यालय इंदवे येथील साहिल रईस कुरेशी या विद्यार्थ्याने कुस्ती या प्रकारात ७१ किलो वजनगटातून तसेच नितिन मच्छिंद्र शिंदे या विद्यार्थ्याने ३५ किलो वजनगटातून विजय मिळवल्याने या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब प्राचार्य बी.एस.पाटील तसेच उपाध्यक्ष आबासाहेब दिनकरराव उत्तमराव पाटील तसेच संस्थेचे सचिव अॅड. नानासाहेब एस. जे. भामरे, शालेय समितीचे चेअरमन आण्णासाहेब डॉ. पी. डी. देवरे, सर्व विश्वस्त तसेच शाळेचे मुख्याध्यापक के. एच. मोरे, पर्यवेक्षक ए. जी. पाटील तसेच सर्व शिक्षक बंधु भगिनी व शिक्षकेतर वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना दादासाहेबांनी प्रत्येकी ५०० रु.चे बक्षिस जाहीर करुन विद्यार्थ्यांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधत त्यांचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. ए.आर.पाटील सर व श्री. वाय.एन.सोनवणे सर यांचेही अभिनंदन केले.
याप्रसंगी आज *शिक्षकेतर कर्मचारी दिनानिमित्त* मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच शिक्षक बंधु भगिनी यांच्याकडून सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.