पिंपळनेर प्रतिनिधी- अनिल बोराडे
साक्री : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे पिंपळनेर शहर भाजपा व प्रज्ञाना आघाडी पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते एडवोकेट संभाजी पगारे होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषद पदवीधर मतदार संघासाठी इच्छुक उमेदवार धनराज विसपुते साखरी तालुका मंडळ अध्यक्ष रावसाहेब मोहन सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे मा.जि.प.सदस्या सविता पगारे, म.फुले विद्या प्रसारक संस्थेच्या सचिव पुष्पलता पगारे, श्रीमती विसपुते पिंपळनेर शहराध्यक्ष नितीन कोतकर जिल्हा सचिव मोतीलाल पोतदार,शां. एज्यु.सो.संचालक रूपेश संधान, पिंपळनेर शहर भाजपा पदाधिकारी बापू माळचे, श्याम पगारे, पंकज भावसार ,प्रज्ञावान आघाडीचे प्रा.के.आर. राऊत, से.नि.प्राचार्य आर.एस.जोशी, मुख्या.ए.पी दशपुते ,ग.स.बँक संचालक शिरीष बिरारीस, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत कोतकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद गांगुर्डे यांनी केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी धनराज विसपुते म्हणाले आपण तीन वर्षापासून पाचही जिल्ह्यात पदवीधर नोंदणीचे काम करीत असून अनेक शिक्षकांचे, विद्यार्थी पालकांचे, संस्थाचालकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.भविष्यात संधी मिळाल्यास पदवीधरांचे प्रश्न, शिक्षक पालक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत .या निवडणुकीतील मतदारांच्या नोंदणीसाठी राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केला. सुरुवातीला ऑफलाइन होणारी नोंदणी ऑनलाईनसाठी न्यायालयात आपण धाव घेतली. त्यात यशस्वी झालो. पुणे, औरंगाबाद, नागपूर प्रमाणेच पदवीधरांची नोंदणी ऑफलाइन प्रमाणेच ऑनलाईन घेण्यात यावी पदवी किंवा पदविकेचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक तपासणी शंका असल्यासच व्हेरिफिकेशन करावे असे सांगितले. पक्षाने आपल्यापेक्षा अधिक कोणी नोंदणी केली असेल त्याला उमेदवारी द्यावी पण आपण सतत तीन वर्षापासून पदवीधर शिक्षकांच्या संपर्कात आहोत .अडीच लाख मतदारांपर्यंत आपण पोहोचलो आहोत. आपल्याला उमेदवारी मिळाल्यास विजयश्री खेचून आणू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एडवोकेट संभाजी पगारे म्हणाले क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा मोठा मतदार संघ आहे. धनराज विसपुते यापूर्वीच्या तीन निवडणुकांमधील चुकांची पुनरावृत्ती टाळून जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करीत आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी म्हणून आपण पक्षाच्या उच्च पदस्थाकडे धनराज विसपुते यांच्या उमेदवारीसाठी डेलिगेशन घेऊन जाणार आहोत .योग्य उमेदवार, जनसंपर्क असलेला उमेदवार विद्यार्थी पालक शिक्षक संस्थाचालकांच्या प्रश्नांची जाण असलेला उमेदवार देणार आहोत. नाशिक अहमदनगरची मक्तेदारी मोडीत काढून धुळे जिल्ह्याला उमेदवारी दिल्यास निश्चितच आपला उमेदवार निवडून येईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.म्हणून सर्वांनी धनराज विसपुते साठी जास्तीत जास्त मतदान नोंदणी करून नाशिक आणि नगरची मक्तेदारी मोडीत काढावी आणि धुळे जिल्ह्यात ही उमेदवारी विजयश्री खेचून आणावी असे आवाहन केले. यावेळी साक्री तालुका मंडळाध्यक्ष रावसाहेब मोहन सूर्यवंशी म्हणाले “आपला माणूस” म्हणून धनराज विसपुतेंना उमेदवारी मिळावी, आपणच उमेदवार आहोत या भावनेने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, चुकांची पुनरावृत्ती टाळावी पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि नाशिक विभागासाठी जमिनीवरचा हा माणूस आपल्या समस्या नक्कीच सोडवेल असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी से.नि. प्राचार्य आर.एस.
जोशी यांनी प्रेरणा गीत सादर केले. या शिबिरात गोवंश रक्षक कार्यकर्त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.शिबिर यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व प्रज्ञावान आघा डीचे,किरण शिनकर, डॉ. भूषण एखंडे,प्रशांत कोतकर प्रा.के.आर.राऊत,महेंद्र बागुल,आदि कार्यकर्ते व पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार से.नि.प्राचार्य एस.डी.पाटील यांनी मानले.