प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या देवनगर गावाजवळ इंडियन ऑइल कंपनीच्या सुशांत पेट्रोल पंपावर दि.२० नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधामुळे त्यांचा डाव फसला व त्यातील एका आरोपीस पकडण्यात यश आले यावेळी परिसरातील नागरिकांनी लुटारूंना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर दुस-या आरोपीला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र अन्य साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला, ही कारवाई एलसीबी आणि साक्री पोलिसांनी संयुक्तरीत्या पार पडली.
या संदर्भात अधिकृत वृत्त असे की, साक्री तालुक्यातील इच्छापुर येथील तिघा तरुणांनी मध्यरात्री देवनगर गावाजवळ असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या सुशांत पेट्रोल पंप लुटण्याचा डाव रचला त्यानुसार तिघे एका दुचाकीने पेट्रोल पंपाकडे निघाले, रात्री अडीच वाजेच्या सुमारास ते सरळ पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये बसलेल्या मॅनेजर सतीश उचाळे यांच्याकडे गेले त्यांना अर्धवट चैन चे सॉकेट व एका बाजूला धार असलेल्या कुऱ्हाडीने धमकावत ” लाँकर ची चावी द्या” अन्यथा….. धमकावत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी मॅनेजर याने प्रसंगावधान दाखवीत आरडाओरड केल्याने कर्मचारी धावून आले यादरम्यान दरोडेखोरांनी रोकड लवकर मिळावी म्हणून मॅनेजरसह कर्मचाऱ्यांवर हल्ला केला यात मॅनेजर उचाळे यांच्यासह युवराज मारनर, नाना मारनर व किरण नांद्रे हे जखमी झाले, हाती काही ही लागत नाही हे बघून तिघा भामट्यांनी प्रयत्न केला असता परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्यापैकी एकास पकडून चोप दिला व त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले पकडलेल्या तरुणाचे नाव आकाश निंबा थोरात(२०) रा. इच्छापुर, दरम्यान पोलिसही घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आकाशची चौकशी केली असता त्याचे दोन्ही साथीदार जितेंद्र वंदे(२१) आणि योगेश मारनर दोन्ही रा. इच्छापुर येथील असल्याचे स्पष्ट झाले लागलीच साक्री पोलीस ठाण्याचे पीआय आनंद कोकरे यांच्यासह पीएसआय बी.बी.न-हे,आर.व्ही.निकम, पोहेकाँ कांबळे,पो.ना. सावळे,पो.काँ. तुषार जाधव,पो.काँ. सुनील अहिरे, चेतन आढारे व तसेच एलसीबीच्या पथकाने जितेंद्र वेंदे यास पहाटे घरातून ताब्यात घेतले संशयीताकडून MH-18 BK 5368 क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली जबरी चोरी करण्यापूर्वी तिघा भामट्यांनी नंबर प्लेटवर चुना फासला होता तरीही शेवटी त्यांचा डाव फसला पोलीस फरार योगेश मारनर याचा शोध घेत आहे.
सदरची कामगिरी एसपी संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, एलसीबी चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पीएसआय बी.बी.न-हे, रोशन निकम, पोहेकॉ कांबळे, पो.ना.सावळे, पो.कॉ. तुषार जाधव, पो कॉ सुनील अहिरे, पो कॉ चेतन आढारे व तसेच एलसीबीच्या पथकाने केली पुढील तपास जारी आहे.
*” पोलीस अधीक्षक बारकुंड यांच्याकडून पीआय कोकरे यांच्यासह टीमला पाच हजारांचा रिवार्ड”*
साक्री पोलीस ठाण्याचे पीआय आनंद कोकरे यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी त्यांची पाठ थोपटवत त्यांच्यासह टीमला पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.