DPT NEWS NETWORK ✍️
प्रतिनिधी – उमेश महाजन
एरंडोल : एरंडोल येथील रेणुका नगर मधील वास्तव्यात असलेले माध्यमिक शिक्षक व्ही.टी. पाटील यांचा मुलगा (साई) यश वासुदेव पाटील वय १६ वर्ष हा घरातील बाथरूम मध्ये अंघोळीस गेला असता गॅस गिझरच्या गॅस गळती झाल्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला ही घटना सोमवारी सकाळी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. यश हा इयत्ता दहावीत रा.ती. काबरे विद्यालयात शिकत होता तसेच त्याचे वडील व्ही.टी.पाटील हे माध्यमिक पतपेढीचे माजी संचालक असून ते सुद्धा त्याच शाळेत कार्यरत आहेत या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान बराच वेळ झाल्यामुळे तो बाथरूम मधून बाहेर न आल्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटली त्यांनी दरवाजा ठोठावला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही शेवटी दरवाजा तोडण्यात आला असता त्याचा मृतदेह आढळून आला त्यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले
यावेळी आई-वडिलांनी एकच हंबर्डा फोडला हे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले असता नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
शिवसेना(उ बा ठा ) पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पुंडलिक पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील,धरणगाव महाविद्यालयातील प्रा.राखी पाटील यांचा तो पुतण्या होत.यश हा एकुलता एक मुलगा होता तसेच त्याची मोठी बहीण पुण्यात नोकरीला आहे.यश क्रिकेटचा चांगला खेळाडू होता.