DPT NEWS NETWORK ✍️
प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : शेवाळी(दा) गावाचे सुपुत्र काँग्रेस कमेटी चे माजी सरचिटणीस तथा शिक्षक नेते प्रा. प्रकाश सोनवणे यांनी खा. राहूल गांधी यांनी काढलेल्या “भारत जोड़ो” यात्रेत सहभाग नोंदविला, या वेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष श्री. नाना पटोले, माजी राज्यसभा खासदार हुसेन दलवाई आदि उपस्थित होते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यात्रेचे नियोजन व कामे सोपविली होती प्रा.सोनवणे यांनी ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
ज्याच्या साठी केला होता अट्टाहास ! तोची दीन गोड झाला….. प्रा.प्रकाश सोनवणे ( शिक्षक नेते,MPCC) महाराष्ट्रात “भारत जोडो” यात्रेचे नांदेड येथे जोरदार स्वागत करण्यात आले. नेहमी प्रमाणे माझ्यावर आदरनिय नेते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी नांदेड जिल्ह्यासाठी पदयात्रेत Speaker दिला. ती जबाबदारी मी प्रामाणिकपने पार पाडली. तदनंतर नांदेड व हिंगोली दरम्यान मी आपले नेते “भारत जोडो” पदयात्री मा.खा. राहुलजी गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.आ.नानां पटोले साहेबांनी माझी भेट घडउन आणली ! भेटी दरम्यान मा. नानांनी, माझी ओळख ” Proper Congress कार्यकर्ता ” अशी मा. राहुलजिंशी करून दिली असता मा.राहुलजीनी त्वरित माझ्या खांद्यावर अभिमानाने व विश्वासाने हात ठेवला व स्मित हास्य करून फोटोग्राफरला फोटो काढण्याचे आदेश दिलेत. अहो भाग्यम् !!!