DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) येथील धीरज संजय जाधव या तरुणाने वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाशी संलग्न इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीत पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग अधिकारी या पदावर निवड.
साक्री तालुक्यातील शेवाळी(दा)येथील धीरज जाधव या तरुणाने अतिशय हलाखीच्या परिस्थितीत यश प्राप्त केले.
जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाच्या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास कुठलेही यश आपल्यापासून फार दूर राहू शकत नाही येणाऱ्या संकटांना न डगमगता मार्ग करीत राहिल्यास आपणास अपेक्षित यश प्राप्त होते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे शेवाळी(दा)येथील *”धीरज जाधव”*. या तरुणाच्या यशातून अधोरेखित होते अनेक अडथळयांनी शर्यत पार करीत धीरज ने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या केंद्र सरकारच्या संलग्न अशा अग्रगण्य कंपनीत मेहनतीच्या जोरावर उच्च पदावर वयाचे अवघ्या 23 व्या वर्षी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफिसर या पदाची मुलाखत उत्तीर्ण होऊन नोकरी प्राप्त केली या पदासाठी त्याला जवळपास 18 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळू शकणार आहे.
अभियांत्रिकी शिक्षणासाठी ‘गेट'(GATE) ही प्रवेश परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालेल्या धीरज ने याच यशाच्या जोरावर नोकरी प्राप्त केली
*संघर्षमय वाटचाल*
धीरज हा आपली आई मनीषा आणि मोठा भाऊ चंद्रकांत यांच्यासोबत शेवाळी या गावातच राहतो धीरज लहान असतानाच आई-वडील हे कौटुंबिक कारणातून विभक्त झाले, विभक्त झाल्यानंतर धीरज आईसोबत खोरी(ता. साक्री) येथे आजोळी शिक्षणासाठी राहू लागला याच ठिकाणी त्याने आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे आई-वडील एकत्र आल्याने त्यानंतर तो नवी आणि दहावीच्या शिक्षणासाठी आपल्या गावी शेवाळी येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात तर अकरावी व बारावीचे शिक्षण साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूल मधून पूर्ण केले बारावीची परीक्षा होते ना होते तोच वडिलांचा अपघाती निधन झाले मात्र अशा परिस्थितीत त्याने न डगमगता सीईटी परीक्षा देत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालयात केमिकल या विषयात बीटेक साठी प्रवेश मिळवला या ठिकाणाहून बी टेक पूर्ण केल्यानंतर २०२१मध्ये गेटची परीक्षा उत्तीर्ण झाला परंतु यात त्याला अपेक्षित रँक न मिळाल्यामुळे त्याने २०२२ मध्ये पुन्हा गेटची परीक्षा देऊन ऑल इंडिया रँक मध्ये ७१वा क्रमांक पटकावला या रैंकमुळे त्याला आयआयटी पवई येथे प्रवेश मिळाला तसेच गेट मधील रँक नुसार त्याची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये देखील निवड होऊन मुलाखत झाली व ती उत्तीर्ण होऊन पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफिसर या पदावर त्याची निवड करण्यात आली.
आयआयटी तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये निवड होणारा धीरज जाधव हा शेवाळी(दा) गावातील कैलास तरुण आहे त्याच्या या यशाबद्दल निवडीबद्दल गावातील सर्वच क्षेत्रातील पदाधिकारी नागरिक त्यांच्या वतीने कौतुक करून शुभेच्छा देण्यात येत आहे.
*मोठा भाऊ चंद्रकांत याच्या त्यागाचे फळ*
धीरज भाऊ चंद्रकांत याची देखील धीरजला खंबीर साथ होती चंद्रकांत याने आपले शिक्षण काही काळापासून थांबवून स्वतः नोकरी करीत आर्थिक भार स्वतःच्या खांद्यावर घेत धीरजचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावले व तसेच आई मनीषा यांनी शेतात मजुरी करून दोन्ही मुलांचा सांभाळ करीत मुलांचे शिक्षण पूर्ण केले त्यांच्या या त्यागाचे धीरज ने चीज करून दाखवले.