DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : सूरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरती असलेल्या साक्री शहरापासून अवघ्या ५ कि.मी अंतरावर असलेल्या शेवाळी(दा)गावाच्या बस स्टॅन्ड जवळ दि.२५ नोव्हेंबर २०२२ रोजी बस आणि टँकर मध्ये अपघात होऊन बसचे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार साक्री आगाराची बस (बस क्र.MH-20 BL 1823) चोपड्याकडून साक्री कडे येत असतांना साक्री कडून धुळे कडे येणारे टँकर (वाहन क्र.MH-18 BG 6687) या टँकर वाहनाने धमणार या गावाकडे वळत असतांना बसच्या पुढील भागाच्या डाव्या बाजूस धडक दिल्याने बसचे नुकसान झाले सुदेवाने या अपघातामध्ये कुणीही प्रवासी जखमी झाले नाही, शेवाळी(दा) येथील बस स्टैंड वरती नेहमी प्रवासी यांची गर्दी असते सुदेवाने त्यावेळेस त्या ठिकाणी गर्दी नसल्याने मोठा अनर्थ ठरला.
घटनेबाबत बस वाहन चालक वजेसिंग गबा राजपूत यांनी साक्री पोलीस ठाण्यात खबर दिली असून साक्री पोलीस ठाण्यात मोटर अपघात रजि.23/2022 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे पोहेकॉ एन डी सोनवणे करीत आहे.