DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री तालुक्यातील सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी जवळील पेट्रोल पंपाशेजारी दुचाकी रस्त्याच्या संरक्षण कठडयास धडकली या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना काल दिनांक २५नोव्हेंबर २०२२ रोजी ०९:३० सुमारास घडली. विजय मंगेश देवरे(५०) रा. देवजीपाडा हे पत्नी व मुलीला घेण्यासाठी देवजीपाड्याहून दहिवेल येथे आले होते त्यांच्या पत्नी अनिता विजय देवरे(४५) यांना गावी देवजीपाडा येथे घेऊन जात असताना समोरील वाहनाच्या लाईटचा प्रकाशात रस्ता न दिसल्याने दुचाकी संरक्षण कठड्यास धडकली, यात विजय देवरे यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने जागी ठार झाले तर अनिता देवरे व मुलगी माहेश्वरी देवरे हे गंभीर जखमी झाले.
दहिवेल प्राथमिक रुग्णालयात त्यांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विजय देवरे यांना तपासून मृत घोषित केले.