DPT NEWS NETWORK ✍️
साक्री: पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी स्थापन झालेल्या जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साक्री तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या जाणून त्यावर चर्चा करण्यासाठी साक्री विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्र साळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जन ग्रामीण पत्रकार संघाची साक्री तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार जी.टी. मोहिते, सतीश पेंढारकर आणि विद्यानंद पाटील यांची धुळे जिल्हा कार्यकारिणी वर नियुक्ती करण्यात आली. तसेच तालुका कार्यकारिणी मध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वाघ यांची अध्यक्ष तर अरुण अहिरराव यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शैलेंद्र साळे यांनी पत्रकारांच्या वाटेला येणारा संघर्ष आणि काळानुरूप बदलती पत्रकारिता लक्षात घेऊन पत्रकारांचे ज्ञान अद्यायवत करण्यासाठी जन ग्रामीण पत्रकार संघ सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल याची ग्वाही दिली. त्यानंतर कार्याध्यक्ष युवराज देवरे यांनी जन ग्रामीण पत्रकार संघाच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत पत्रकारांच्या समस्या लक्षात घेऊन पत्रकार संघाची गरज नमूद केली. तसेच जन ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे यांनी पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीची रूपरेषा सांगत पत्रकारांना संघटीत होण्याचे आवाहन केले.
जन ग्रामीण पत्रकार संघ साक्री तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ यांनी तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या निवारणासाठी व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत झालेली नियुक्ती सार्थ ठरवू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
जन ग्रामीण पत्रकार संघ साक्री तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.
तालुकाध्यक्ष – प्रकाश वाघ
कार्याध्यक्ष – अरुण अहिराव
उपाध्यक्ष – अकील शहा
शहराध्यक्ष – जितेंद्र जगदाळ
शहर उपाध्यक्ष – संघपाल मोरे
तालुका संघटक – उमाकांत अहिरराव
सहसंघटक – रतिलाल सोनवणे
सचिव – खंडेराव पवार
कोषाध्यक्ष – कल्पेश मिस्तरी
प्रसिद्धी प्रमुख – चंद्रशेखर अहिरराव
निजामपुर जैताणे विभाग प्रमुख – विकास महिरे,
दहिवेल विभाग प्रमुख – राहुल राठोड,
पिंपळनेर विभाग प्रमुख – तुषार ढोले