DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका हा आदिवासी बहुल असून क्षेत्रफळाच्या दुष्टीकोणातून मोठ्या स्तरावर व्यापलेला आहे.येथे मुख्य व्यवसाय शेती असून त्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो.परंतु शेतकऱ्यांना विविध कारणासाठी लाभदायक क्षेत्राचा दाखला घेण्यासाठी धुळे येथील कार्यालय गाठावे लागते त्याला अपवाद शिरपूर असून तेथील शेतकऱ्यांना तिथेच दाखला उपलब्ध होत आहे.
तरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी पाहता लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावर मिळावा अशी मागणी तालुका भाजपाच्या वतीने सहाय्यक अभियंता (श्रेणी -१) पाटबंधारे विभाग,साक्री यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष वेडू अण्णा सोनवणे,तालुकाउपाध्यक्ष राकेशजी दहिते,सहकार आघाडीचे विभाग संयोजक योगेशजी भामरे,तालुका चिटणीस सुभाष निकम सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.