DPT NEWS NETWORK ✍️.
प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री: पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे व पक्षाची ध्येय धोरणे आपल्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या मनात व सर्व सामान्य जनतेच्या मनात रुजवणे, पक्षाचे लोकोपयोगी कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवणे आणि पक्षाच्या जेष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी दिलेल्या सभापती संधीचे सोने करणे हेच माझे काम राहील. असा विश्वास नुतन जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते यांनी साक्री नगर पंचायतीत आयोजीत सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केला.
धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी निजामपूर गटाचे युवा सदस्य हर्षवर्धन दहिते यांची सार्थ निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम साक्री नगरपंचायतीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.जयश्रीताईअ पवार होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुअन जि.प.सदस्स्य विजय ठाकरे, गटनेते तथा उपनगराध्यक्ष बापुसाहेब गीते, शहरातील प्रतिष्ठित सराफा व्यापारी दिलीप विसपुते,उत्पल नांद्रे, अतुल दहिते, याकुब शेठ पठाण, प्रा.शशीकांत सुतार, युवामोर्चा तालुका अध्यक्ष प्रा.शिवाजी देवरे, व्यापारी आघाडिअचे राजेंद्र शर्मा, जगदिश चाळसे, कावठेचे सरपंच सुभाष बोरसे, पाणीपुरवठा सभापती रेखाताई सोनवणे, आरोग्य सभापती मनिषाताईअ देसले, महिला समिती सभापती जयश्री पगारीया, उपसभापती संगिता भावसार, नगरसेविका उज्वला भोसले, ऊषाताई पवार, अड. पुनम काकुस्ते, प्रविण निकुंभ, हेमंतपवार, महेंद्र सेदले, आबा सोनवणे, प्रा.अनिल पवार, विनोद पगारीया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अड. पुनम काकुस्ते यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, तालुक्याचे युवा नेतृत्व हर्षवर्धन दहिते म्हणजे नेतृत्व, दातृत्व व कर्तृत्व यांचा मिलाप असलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या वरील नेत्यांनी दिलेल्या जबाबदारीला ते निश्चित न्याय देतील असा विश्व्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक, सुत्रसंचलन व आभार माजी तालुकाध्यक्ष विजय भोसले यांनी केले.