DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी- मनोहर पाटील
धुळे : महाराष्ट्रातील महिला वरील अत्याचार काही थांबता थांबेना असंच एक प्रकार धुळे जिल्ह्यातील धुळे शहरात घडला. शहरातील जुने धुळे भागात गावठी कट्ट्याचा धाक दाखवून महिलेवर एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनेचे गांर्भीय ओळख गुन्हा दाखल करुन संशयिताला अटक करण्यात आली आहे. सुभाषनगरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत पीडित महिलेने आझादनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चंद्रशेखर हुमचंद मराठे (वय40) रा. सुभाषनगर, 16 नंबर शाळेजवळ जुने धुळे याने आज दि. 27 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पीडित महिलेच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर महिलेला जबरीने मागच्या खोलीत ओढून नेले. तेव्हा पीडितेने आरडाओरड केली असता मराठे याने त्याच्या पँटच्या मागील बाजूला असलेला गावठी कट्टा काढून पीडित महिलेच्या मुलाच्या डोक्याला लावला. तुझ्या सर्व मुलांना जीवे मारेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान सकाळी ही घटना उघडकीस येताच या घटनेला जातीय रंग दिला जाता होता. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एस. ऋषीकेश रेड्डी, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, आझादनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दिनेश पावरा यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला.
पोलिसांनी महिलेची फिर्याद नोंदवून घेत संशयित मराठे यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रिव्हॉल्वर देखील जप्त करण्यात आली. त्याच्याविरोधात आझादनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 376, 452, 506 (2) सह 3/25 आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दीपक पावरा हे करीत आहेत. घटनास्थळी तणावपुर्ण शांतता असून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणाच्या तपासावर आणि परिस्थितीवर पोलिस अधिक्षक हे स्वत: लक्ष ठेवून आहेत.