DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : गर्दीच्या ठिकाणी महिलेची बॅग हिसकावून पळणाऱ्या पर राज्यातील महिलांच्या टोळीला पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या काही तासातच मुद्देमालासह जेरबंद केले, टोळीतील तिघा महिलांकडून १२हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय सचिन साळुंखे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कल्पना रघुनाथ गायकवाड (वय ५०)रा. चिंचपाड़ा ता. साक्री ही महिला काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपळनेर गावातील बस स्थानकाजवळील तुलसी शॉप समोरून जात असताना दहा हजार रुपयांची रोकड असलेली बॅग तीन महिलांनी हिसकावून पळ काढला होता, याप्रकरणी कल्पना गायकवाड यांनी पिंपळनेर पोलिसात फिर्याद दिली, फिर्याद दाखल होतात एपीआय सचिन साळुंखे आणि त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली संध्याकाळी ०६:३० वाजेच्या सुमारास गुजा संदीप सिसोदिया, सगुना अजबसिंग सिसोदिया, भारती सिसोदिया सर्व रा. राजगड( मध्यप्रदेश) या तिघा संशयीतांना पोलिसांनी पकडले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे कल्पना गायकवाड यांची बॅग आणि रोकड मिळून आली तीघा परप्रांतीय महिलांना अटक करण्यात आली असून तपास पीएसआय बीएमआय चे करीत आहेत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन साळुंखे पीएसआय बी एन माळचे, हिराबाई ठाकरे निलेश महाजन, सोमनाथ पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.