DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकील शहा
साक्री :- पिंपळनेर या शहराची लोकसंख्या ५० हजारच्या जवळपास असल्यामुळे ,चिकसे रोडवरील स्मशानभूमी ही अनेक बाबतीत गैरसोयीची ठरत आहे .या स्मशानभूमीत फक्त तीन प्रेतांवरच अंत्यसंस्कार करण्याची सुविधा आहे. गाव मोठे असल्यामुळे एकाच दिवशी चार ते पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांची गैरसोय होते, अशावेळी जागा नसल्यामुळे नाईलाजास्तव बाजूला अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे प्रेताची अवहेलना होते. पावसाळ्यात ही समस्या जास्त असते, तसेच चिकसेरोड वरील स्मशानभूमीचे अंतर देखील जास्त असल्यामुळे रामनगर, घोड्यामाळ इत्यादी भागातील रहिवाशांना त्यात वृद्ध व अपंगांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. व भविष्यात हा त्रास वाढतच जाणार आहे. जवळच्या सामोडे या लहानशा गावात दोन स्मशानभूमी आहेत, तरी रामनगर घोड्यामाळ इत्यादी भागातील नागरिकांच्या सोयीसाठी नदीकाठी स्वतंत्र स्मशानभूमीची सोय करावी ,अशी मागणी पिंपळनेर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.देविदास सोनवणे यांच्याकडे अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष प्रवीण थोरात व बलराज अहिरराव व गुलाबरावआण्णा गांगुर्डे यांनी लेखी स्वरुपात केलेली आहे.