DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – अजगरभाई मुल्ला
धुळे : तालुक्यातील तरवाडे शिवारात ट्रकने हुलकावणी दिल्याने चाळीसगाव-अक्कलकुवा एस.टी.बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र 26 प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींना जिल्हा व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव-अक्कलकुवा ही बस (क्र.एमएच 14 बीटी 2710) आज सकाळी 7 वाजेचे सुमारास प्रवासी घेवून जात होती. तरवाडे गाव शिवारात समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला हुलकवणी दिली. त्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला जावून उलटली. त्यात बसमधील 26 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व कर्मचारी सुनील जावरे, राकेश शिरसाठ यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तत्काळ उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती स्थिर आहे.
जखमींमध्ये सचिन देविलाल राठोड (वय17), राहुल प्रकाश चव्हाण (वय 17), सुजाता उमेश कोळी (वय 18), नेहा दगडु माळी (वय 18), निकीता जितेंद्र जमादार (वय 19), सानिका दैवत पाटील (वय 18), सिमा जितेंद्र जमादर (वय 35), भाग्यश्री विश्वास माळी (वय 17), चेतन ज्ञानेश्वर पाटील (वय 17), छाया सचिन महाजन (वय 29), साक्षी सचिन महाजन (वय 7), इशान सचिन महाजन (वय 5), अरुण रामभाऊ पाटील (वय 63) सर्व रा. तरवाडे ता. धुळे, अनिल दत्तु पवार (वय 50), अनिल पुंजाराम सोनवणे (रा. बोरकुंड होरपाडा ता.धुळे), पृथ्वीराज एकनाथ जाधव (वय 35 रा.पिंपळखेड ता. चाळीसगाव), विजय सुभाष गांगुर्डे (वय 35 रा.मेहुणबारे ता. चाळीसगाव), विष्णु चंदन पाटील (वय 40 रा.गणेशपूर ता.चाळीसगाव), ऋषिकेश प्रेमसिंग एंडाईत (वय 19 रा.सिताणे ता.धुळे), गोपाल देविदास ढालवाले (वय 30 रा.मेहुणबारे), रामसिंग भामरा वसावे (वय 30 रा. भामरापाली ता. अक्कलकुवा), ललीता सतिष शिरोडे (वय 40), सतिष रामकृष्ण शिरोडे (वय 45 रा.चाळीसगाव) सुरेश प्रभाकर सोनजे (वय 16 रा. चिंचगव्हाण ता. चाळीसगाव) व विजय धर्मा केदार (वय 36 रा. करमुड ता. चाळीसगाव) यांचा समावेश आहे.