DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – उमेश महाजन
एरंडोल – येथे २९ नोव्हेंबर २०२२ पासून भरलेल्या नथ्थू बापू उर्सात खुलेआम सहा “गुळगुळी” नावाच्या जुगाराचे स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. या जुगारामुळे नागरीक विशेषतः तरुण वर्गाचे आर्थिक लुबाडणूक होत आहे. सदर जुगार त्वरित बंद करण्यात यावे अशी जाणकार नागरिकांची मागणी आहे.
दर वर्षाप्रमाणे यंदाही एरंडोल येथे जातीय सलोखा व बंधुभावाचे दर्शन घडविणारा असा नथ्थु बापू उर्स नुकताच सुरू झाला. या उर्सात नथ्थु बापूच्या समाधी स्थळापासून जवळपास शंभर ते दीडशे मीटर अंतरावर पाच ते सहा जुगाराचे स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. मंडप टाकून हा “गुळगुळीचा” जुगार खुलेआम सुरू आहे शाळेच्या विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी याच रस्त्यावरून ये जा करतात यामुळे विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर त्याचा गंभीर परिणाम होतो. जुगार खेळणाऱ्यांचा या उपद्रवामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. म्हणून सदर जुगार त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी होत आहे.