DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – उमेश महाजन
एरंडोल – तालुक्यातील तळई येथे सालाबाद प्रमाणे २९ नोव्हेंबर २०२२ रोजी बारागाडी ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मांडीवरून व पोटावरून चाक गेल्यामुळे राहुल पंडित पाटील वय ३० वर्ष हे जागीच ठार झाले. तर ३ जण जखमी झाले. यामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागले.
मृत राहुल पंडित हे जिल्हा बँक निपाणे येथे कार्यरत होते. मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता नवमुठी विहिरीपासून ते तळई बस स्थानकापर्यंत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. जवळपास अर्धा किलोमीटर बारा गाड्या ओढण्यात आल्या .