शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रारी अर्ज दाखल
महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून आत्मक्लेश आंदोलन केले
DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी:- युवराज पाटील
धुळे : धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करून भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
काल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा काढली असे वादग्रस्त विधान केले आहे. गेल्या काही दिवसात सध्याच्या मंत्रिमंडळातील विशेषता भाजपा नेते, पदाधिकारी हे जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहे. तसेच त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचे महापुरुष तिघांबाबत अपमानजनक वाक्य वापरून भीक मागत आहेत असे भाषणात सांगितले. या विरोधात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन करून शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रारी अर्ज दिला.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आत्मक्लेश केला. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजीत राजे भोसले, गोरख शर्मा, मंगेश जगताप, भिका नेरकर, उमेश महाले, रईस काझी, रईस शेख, राजेंद्र सोलंकी, महेंद्र शिरसाठ, राजेंद्र चौधरी, दीपक देवरे, सोनू घारू, दत्तू पाटील, संदीप पाटील, अमीन शेख, एजाज शेख, वाल्मिक मराठे, जीद्द्या पहेलवान, नईम हिरो, दीपक देसले, गोलू नागमल, रामेश्वर साबरे, रतन गोपाल, विशाल केदार, शोएब अन्सारी, तस्वर बेग, गणेश बच्छाव, मयूर देवरे, निखिल पाटील, महेश भामरे, सुमित खैरनार, सरोजताई कदम, संगीता खैरनार, वंदना केदार, शारदा भामरे, वनिता गरूड, वर्षा सूर्यवंशी, कविता खेडकर, विमलबाई सोनवणे, स्वामिनी पारखे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.