DPT NEWS NETWORK
वार्ताहर – मुक्त पत्रकार ( संतोष शिंदे )
रत्नागिरी: संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांची पुण्यतिथी रत्नागिरीत विविध उपक्रमाने उत्साहात संपन्न. रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाच्या वतीने येथील श्री विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांची 66 वी पुण्यतिथी आणि या मंदिरातील बाबांच्या मूर्ती प्रतिष्ठानचा 32 वा वर्धापन दिन दिनांक 20 डिसेंबर रोजी विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला सकाळी गाडगेबाबांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्री वाडेश्वर भजन मंडळातर्फे मंडळातर्फे सुश्राव्य संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या उत्सवाला जिल्ह्यातील कार्यकर्त्या बरोबरच भाविक मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती त्यांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आला विठ्ठल मंदिरातील या कार्यक्रमाला दैनिक रत्नागिरी टाईम चे संपादक उल्हासराव घोसाळकर नित्यानंद दळवी राजीव किर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र गावडे तसेच पुण्याचे परीट समाजाचे कार्यकर्ते ॲड. संतोष शिंदे रत्नागिरीतील एडवोकेट प्रीतम अहिरे तसेच त्यांचे सहकारी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून गाडगेबाबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्याप्रसंगी मेळाव्यात दोन घास कमी खा पण शिक्षण घ्या, शिक्षीत व्हा, देशाची शिक्षीत युवा पिढी देशाचं भविष्य आहे त्यामुळे गरिबी असली तरी मागे न राहता शिक्षण घ्या असे वक्तव्य ॲड. संतोष शिंदे यांनी त्यावेळी सर्वांना केलें.
दुपारी पण समाजाच्या समाज मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला गाडगेबाबांच्या जीवनावरील वक्तृत्व स्पर्धा महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, दिनांक 18 रोजी दुपारच्या सत्रात वारली पेंटिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. तसेच शैक्षणिक आणि विविध क्षेत्रात प्राविण्य संपादन केलेल्या समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला यावेळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत विष्णू नाचणकर आणि सौ पुष्पा यशवंत नाचणकर या दाम्पत्याचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या मेळाव्याचे अध्यक्षस्थान जेष्ठ सल्लागार मधुकर कदम यांनी भूषविले प्रारंभी जिल्हा परीट समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र नेरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून परीट समाजाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच प्रतिवर्षाप्रमाणे पुण्यतिथी निमित्ताने 18 डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा नगर येथे स्वच्छता अभियान राबवून बाबांचा स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र समाजात पोहोचविला असे सांगितले मेळाव्याला समाजाचे माजी अध्यक्ष शशिकांत नाचणकर माजी सचिव प्रभाकर कासेकर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ संगीता कासेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना गाडगेबाबांनी शिका आणि साक्षर व्हा अंधश्रद्धेचे निर्मूलन करा या दिलेल्या संदेशाचे स्मरण करून दिले समाजाचे सेक्रेटरी जितेंद्र नेरकर यांनी परीट समाजाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली विशाल कदम यांनी आभार प्रदर्शन केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले या मेळाव्याला उपाध्यक्ष अमित कोरगावकर सदस्य केदार कोरगावकर खजिनदार प्रसाद मस्के यांचे सह तरुण कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.