अमोल सोनवणे यांना प्रणेता देसले, प्रमोद माळी, संदीप बच्छाव, विशाल खैरनार यांची अनमोल साथ
DPT NEWS NETWORK ✍️
दहिवेल प्रतिनिधी :- राहुल राठोड
धुळे : दहीवेल ग्रामपंचायत निवडणुकीत प्रणेता देसलेंनी आपल्या समर्थकांना परिवर्तनासाठी सज्ज व्हा अशी विनंती केली होती. प्रचाराच्या रणधुमाळीत प्रणेता देसले व मित्र परिवाराने आघाडी घेतली होती त्यात जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. ह्या वर्षाची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. शेवटी विजयाचा कौल हा मतदार आपल्या मतदानातून देतात हीच भारतीय लोकशाहीची खरी ताकद आहे. दहिवेलचे सामाजिक कार्यकर्ते प्रणेता देसले हे जवळ पास गेल्या वीस एकवीस वर्षांपासून परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत आपली स्वतंत्र ओळख, कार्यशैली सर्वसामान्य जनतेशी असलेले आपुलकीचे नाते युवकांची फळी व देसलेंच्या भूमिकेला महत्व देणारा एक स्वतंत्र वर्ग आहे. अनेक निवडणुकीत देसलेंची भूमिका महत्वाची ठरलेली आहे देसलेंनी नेहमीच जनतेच्या हितासाठी जो उमेदवार किंवा पॅनल घेईल त्यांनाच पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली आहे. दहिवेल परिसरात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, क्रीडा, जलसंवर्धन, तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत त्यामुळे त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. अनेक वेळा प्रणेता देसले हे त्यांच्या केलेल्या कामाला प्रसिद्धी देत नाहीत किंवा तो त्यांचा स्वभाव नाही म्हणून सहजासहजी प्रणेता देसले यांचा सर्वसामान्य जनतेशी असलेलं नातं लक्षात येत नाही परंतु ज्यांना माहित आहे ते जाणून आहेत आणि त्यामुळे प्रणेता देसले यांच्या शब्दाला किंमत देणारा एक स्वतंत्र वर्ग आहे. प्रणेता देसले यांची नेहमीच सर्वधर्म समभावची भूमिका असते त्यामुळे प्रत्येक समाजात त्यांचे चांगले संबंध आहेत. प्रेमळ वागण्याची बोलण्याची एक विशिष्ट पद्धत असल्यामुळे युवा वर्गाशी त्यांची नाळ जडलेली आहे. प्रणेता देसले यांना शासनाचे पुरस्कार तसेच अनेक नामांकित संस्थांच्या वतीने गौरवण्यात आले आहे. प्रणेता देसले यांनी अनेक संघटना, संस्थांवर काम केलेले आहे म्हणून त्यांच्या भूमिकेला महत्व देणारा एक स्वतंत्र वर्ग आहे जो नेहमीच दहिवेलच्या निवणुकीत निर्णायक ठरतो त्यामुळेच ह्या वर्षी होऊ घातलेल्या दहिवेल ग्रामपंचायत निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते प्रणेता देसलेंची भूमिका निर्णायक ठरणार होती. जनतेने शेवटी परिवर्तन पॅनलला कौल दिला. दहिवेलमध्ये प्रामुख्याने अमोल सोनवणे यांच्या परिवर्तन व प्रभाकर बच्छाव यांच्या प्रगती पॅनलमध्ये लढत होती. परिवर्तन पॅनलला साहेबराव बच्छाव, हिम्मतराव बच्छाव, धोंडू बच्छाव, राजेंद्र बच्छाव, वसंतराव बच्छाव, एकनाथ गुरव, पुंजाराम चौधरी, श्रावण माळी, मनोज चौधरी, चंद्रकांत वाणी, प्रणेता देसले, प्रमोद माळी, संदीप बच्छाव, विशाल खैरनार यांची साथ होती तर प्रभाकर बच्छाव यांच्या प्रगती पॅनलला यशवंतराव माळी व सतीश बच्छाव यांची साथ होती. दहिवेलमध्ये अनेक वर्षांपासून प्रभाकर बच्छाव यांची सत्ता होती परंतु आजच्या मतमोजणीत दहिवेलकर जनतेने इतिहास घडवीत परिवर्तन पॅनलच्या सर्व जागा निवडून परिवर्तनाचा इतिहास घडविला. अमोल सोनवणे यांनी विकासाच्या मुद्यावर जनतेकडे मते मागितली व दहिवेलच्या जनतेने त्यांना भरगोस मते दिली. अमोल सोनवणे यांचा पॅनल निवडून आल्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमोल सोनवणे यांच्या पॅनलची दहिवेलमध्ये जंगी विजय मिरवणूक काढण्यात आली.