DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी : प्रभु तडवी
अक्कलकुवा : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामपंचायतीवर १९९७ साला नंतर कोणत्याच पक्षाला सलग सत्ता मिळवता आली नव्हती परंतु भारतीय जनता पक्षाचे पॅनल प्रमुख विनोद कामे यांनी २५ वर्षांनंतर सलग दोन वेळा सत्ता स्थापन करून २५ वर्षानंतर इतिहास मोडीत काढत सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन करण्याचा इतिहास घडवून आणला आहे.खापर गावातील जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे. त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास खापर ग्रामपंचायती चे नवनियुक्त सदस्य व भा ज पा चे पॅनल प्रमुख तथा तालुका अध्यक्ष विनोद कामे यांनी दै.देशदूत शी बोलतांना सांगितले.
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामपंचायतिची निवडणूक नुकतीच पार पडली यात १७ पैकी ११ जागेवर भारतीय जनता पार्टी चे
ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. तर लोकनियुक्त सरपंच म्हणून किरण पाडवी हे निवडून आले. यावेळी विनोद कामे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, आम्ही मागील पाच वर्षात जो गावातील सर्वांगीण विकास केला आहे त्या विकास कामाची पावती आम्हाला खापर जनतेने दिली आहे. येणाऱ्या काळात देखील या विकासाच्या रथाला अधिक गती देण्याचे काम आमचे पूर्ण ग्रामपंचायत टीम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.