DPT NEWS NETWORK ✍️
धुळे: तालुक्यातील निमडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी पत्रकार दिन तसेच जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत जन ग्रामीण पत्रकार संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत गरजू विद्यार्थी शिक्षणात मागे पडणार नाहीत यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन जन ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे यांनी केले. शाळेच्या वतीन नम्रतादेवी पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अरविंद गायकवाड यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना देवरे शिक्षिका वंदना पाटील, छाया पाटील, मनिषा पाटील, योगिता मोरे, हर्षदा पाटील तसेच जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्र साळे, कार्याध्यक्ष युवराज देवरे, प्रवक्ता प्रशांत पाकळे, प्रसिध्दी प्रमुख देवेशकुमार तांदळे आणि जनसंपर्क प्रमुख प्रतिक कुलकर्णी उपस्थित होते.