DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: अकील शहा
साक्री : साक्री शहरातील अग्रेसर सामाजिक कार्यकर्त्या जोशीला ताई पगारिया यांच्यातर्फे दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र राज्यात ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून साक्री तालुक्यातील पत्रकार बंधू यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी त्यांनी सर्वप्रथम दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व पत्रकार बांधवांना मनापासून शुभेच्छा दिल्या व तसेच यावेळी पत्रकारितेत आपलं सर्वस्व अर्पण करून कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रात्र दिवस् काम करत पत्रकारिता करण्याऱ्या सर्व पत्रकारांचा सत्कार करुण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकारांच्या वतीने जन ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या जोशीलाताई पगारिया यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी जेष्ठ पत्रकार विजय भोसले सर यांनी उपस्थित पत्रकार बांधव यांना मार्गदर्शन केले त्यांनी दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर थोडक्यात माहिती देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी पत्रकार विद्यानंद पाटील, पत्रकार विजय भोसले, पत्रकार प्रकाश वाघ, पत्रकार खंडेराव पवार, पत्रकार कल्पेश मिस्तरी, पत्रकार सचिन सोनवणे, पत्रकार जगदीश जगदाळे, पत्रकार अकिल शहा,पत्रकार तुषार ढोले, पत्रकार दीपक मोरे, पत्रकार शरद चव्हाण आदि उपस्थित होते.