DPT NEWS NETWORK ✍️
प्रतिनिधी । मनोहर पाटील
धुळे : मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने पत्रकार दिवस साजरा करण्यात आला.यावेळी पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती संजिवनी सिसोदे यांच्या उपस्थितीत पत्रकारा दिनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे उपस्थित होते.यावेळी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तसेच जिल्हा परिषदेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सभापतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी याेगेंद्र जुनागडे आणि संजीवनी सिसोदे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वनराज पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी पाटील,अनिल बेडसे आदिंनी परिश्रम घेतले.