DPT NEWS NETWORK ✍️
धुळे : दिनांक ६ जानेवारी रोजी मनसे राज्य उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र पक्ष निरीक्षक श्री विनय भोईटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे च्या वतीने ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
गेल्या काही दिवसापासून धुळे शहर व जल्ह्यातील प्रचंड तापमान खलावत आहे , अनेक गोरगरिबांचे हाल होत आहेत. थंडीत ऊब देण्याचा या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध धार्मिक स्थळ यांच्या बाहेर बसणाऱ्या भिक्षा मागणाऱ्या गोरगरिबांना, तसेच *संस्कार अनाथ व मतिमंद मुलींच्या शाळेत* ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर *नवनिर्माण समाजसेवक कुष्ठरोग आश्रमात* देखील रुग्णांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच *एकविरा माता मंदिराजवळ असलेल्या धुळे महानगरपालिकेच्या बेघर निवारा या आश्रमातील* व्यक्तींना देखील ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे राजेन देशमुख यांच्या हस्ते आज एकूण ३०० ब्लॅंकेट धुळे शहरात वाटप करण्यात आले आहेत. तसेच शिरपूर येथे देखील ब्लॅंकेट वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
ब्लॅंकेट वाटपाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्हाध्यक्ष ॲड.दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सचिव संदीप जडे ,अजितसिंह राजपूत, तालुकाध्यक्ष संतोष मिस्तरी, शहर सचिव हरीश जगताप, विभाग अध्यक्ष सतीश पाटील, रोहित नेरकर ,अमृत पाटील, योगेश वाणी,मनसे मराठी कामगार सेना शहर संघटक योगेश सैंदाणे, तालुका उपाध्यक्ष जयेश पाटील , धुळे तालुका सचिव विजय मिस्तरी उपस्थित होते.