DPT NEWS NETWORK ✍️
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील श्री लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी उंटावद, तालुका शहादा, जिल्हा नंदूरबार या सूतगिरणी संचालकांनी शेतकरी श्री बबनराव बोरसे, मानक चंद लोढा, हार्दिक लोढा, गजानन सोनावणे, सोनाबाई कायस्थ आदी अनेकांचा कापूस २ वर्षापूर्वी खरेदी केला व मालाची रक्कम २ महिन्यांनी मिळेल असे देखील सांगितले. त्या ऐवजी त्यांनी पक्के बिल व धनादेश सुद्धा दिले. पण आज २ वर्षे उलटून गेल्यावर सुद्धा सूतगिरणी चालक व मालक शेतकऱ्यांचे पैसे देत नसल्यामुळे हवालदिल झाले आहे. एकूण ४३ लाख रुपये हे या शेतकऱ्यांचे येणे बाकी असून, अंदाजे ३०-४० कोटी रुपये हे इतर शेतकऱ्यांचे सूतगिरणी कडे बाकी आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. कृपया आपण या सर्व प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून शेतकऱ्याना न्याय द्यावा ही विनंती पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
यासाठी दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालय नंदुरबार समोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील तन्मय जैन यांनी दिला आहे. शेतकरी हितासाठी मी आत्मदहन करणार आहे. यानंतर तरी प्रशासनाला जाग येईल ही अपेक्षा
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची नावे व रक्कम(अंदाजे)
बबनराव माधवराव पाटील:- १५००००० (१५लाख)
मानकचंद ताराचंद लोढ़ा :- ८०००००( आठ लाख)
हार्दिक माणकचन्द लोढ़ा :- १२०००००( बारा लाख)
सोनाबाई सुभाष कायस्थ :-४५००००(चार लाख पन्नास हजार)
गजानन दोधा सोनावने :- ३६६०००( तीन लाख सहासष्ट हजार)