DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: प्रभू तडवी
अक्कलकुवा : लग्नकार्यासाठी जात असताना ट्रॅक्टर व ईरटीका कार च्या अपघात होऊन वडील व मुलगा जागीच ठार झाला असून पत्नी व एक मुलगा आणि मुलगी गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अक्कलकुवा येथील पाच सदस्यांचे परिवार ईरटीका कार क्रमांक जी.जे 16 बी.बी. 53 23 ने नयनशेवडी येथे लग्नकार्यासाठी जात असताना अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील जामली फाट्या जवळ समोरून येणाऱ्या उसाने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक जी जे 26 ए बी 18 24 या दोघांमध्ये अपघात होऊन सुनील रमण बागले वय 45 व उमेश सुनील बागले वय 15 हे दोन्ही पिता पुत्र जागीच ठार झाले मिराबाई सुनील बागले वय 45 विपुल सुनील बागले वय 11 वर्षे प्रतिभा सुनील बागले वय सोळा वर्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर परमार यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे .मृतांचे शवविच्छेदन अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येऊन त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे
दरम्यान अपघात घडल्यानंतर अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश गावित यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी भेट दिली अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती ती सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर होते.